छत्रपती संभाजीनगर:- जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावावर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत केला आहे. तसेच आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर शहरातील परिसरात घडली आहे. पीडितेचा सख्खा भाऊ तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करत होता. इतकेच नव्हे तर, सहा महिन्यांपूर्वी नातेवाईक असणाऱ्या पोलीस कर्मचारी सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील घरी कोणी नसताना पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ज्यामुळे पीडित मुलीच्या मनात पूर्णपणे भीती निर्माण झाली होती. मात्र एकेदिवशी पीडित मुलीला आपण गर्भवती राहिल्याचे समजले. ज्यानंतर तिने स्वतः आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.

या प्रकरणात सर्वात पहिल्यांदा पोलिसांनी पीडित मुलीच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतात, भाऊ शहरातून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासातून त्याला शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या. त्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर नात्यातील पोलीस कर्मचारी असणाऱ्या सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिले. ही माहिती मिळतात पोलिसांनी गांगुर्डे याच्यावर देखील गुन्हा दाखल केला. सध्या या सर्व घटनेचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. त्यांनी मुलीचा जबाब नोंदवून घेत आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






