गोविंद महाराज संस्थानच्या प्रमुख विश्वस्त गुरूवर्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात कडक कारवाईची मागणी

Spread the love

जामनेर पोलीस ठाण्यात दिली लेखी तक्रारीचे निवेदन, बहुसंख्य भाविकांची उपस्थिती जामनेर(प्रतिनिधी):- योगीराज गोविंद महाराज संस्थांनांचे राज्यभरात आश्रम असुन भाविक ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच धर्तीवर संबधीत संस्थेचा श्री समर्थवाडी बडनेरा रोड अमरावती येथे आश्रम आहे. या आश्रमाचे प्रमुख विश्वस्त गुरूवर्य भाऊसाहेब फिरके हे आश्रमाची सुव्यवस्था व भाविकांना अध्यात्मिक शिकवणीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात.

परंतु तेथीलच घनश्याम राजेंद्र ढोले नामक व्यक्ती आश्रमातील गुरूवर्य भाऊसाहेब फिरके यांच्या विरोधात संस्थेच्या आर्थिक कारभारा विषयी खोटे आरोप करीत सोशल मिडिया व दैनिकात बदनामी कारक मजकूर प्रसिद्ध करून समाज मनात गुरूवर्य यांच्या विषयी पुर्वग्रह दुषीत मनाने अपप्रचार करत असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या समाज विघातक घटकावर कडक कायदेशीर करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील भाविकांनी आपला निषेध नोंदवला आहे.

त्याच प्रमाणे जामनेर तालुक्यातील भाविकांनी सुद्धा ढोलेच्या विरोधात कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी निवेदन दिले आहे. यावेळी प्रकाश बाबुराव पाटील,सुरेश शिवराम पाटील,रवींद्र शिवराम पाटील,रामदास शिवराम पाटील,भाऊराव पांडुरंग पाटील,गोपाल ओंकार पाटील,पंडीत मोतीराम पाटील, राजश्री चंद्रशेखर पाटील, रूपाली चंद्रशेखर पाटील,

दिपाली पुरूषोत्तम पाटील,गयाबाई लक्ष्मण पाटील,हर्षवर्धन पुरूषोत्तम पाटील, सुलभा बळीराम चौधरी आदिसह महिला व पुरुष भाविकांच्या तक्रारी निवेदनावर सह्या आहेत. दरम्यान धर्मदाय आयुक्त अमरावती यांनी घनश्याम ढोले यांच्या तक्रारी वरून चौकशी केली असता चौकशीत कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे निष्पन्न झाले.

हे पण वाचा

टीम झुंजार