कोल्हापूर :- बायकोकडे बघत असल्याच्या संशयावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट हातात सुरा घेऊन परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती. या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या घटनेनंतर सुरा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आलं आहे. तसेच या कर्मचाऱ्याच्या पोलीस पत्नीलाही निलंबित केले आहे.
कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी परिसरात ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात पाचगावात दोन दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने हातात सुरा घेऊन दहशत माजवली होती. बायकोकडे बघत असल्याचा संशयातून शेजारी राहत असलेल्या तरुणाला आणि त्याच्या आईला धमकावले होते.

सदर घटनेनंतर या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे आणि त्यांच्या पत्नीला निलंबित करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली होती.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






