ग्वाल्हेर : असे म्हणतात की, ‘वासनेच्या आहारी गेलेली व्यक्ती स्वतःसोबत कुळाचाही नाश करते. याचे ताजे उदाहरण नुकतेच मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातून समोर आले आहे. वासनेच्या आहारी गेलेल्या एका महिलेले आपल्याच लहान दीराला प्रेमपाशात ओढले. ही गोष्ट जेव्हा तिच्या पतीला समजली तेव्हा त्या दोघांनी मिळून पतीचाच काटा काढला. त्यानंतर हत्येला अपघाताचे स्वरूप देऊन पतीचा अत्यंसंस्कारही केला.
विषय वासनेच्या आहारी गेलेली व्यक्ती सगळी लाज लज्जा सोडून देते. त्यांना समाजाचे, पवित्र नात्यांचेही भान राहत नाही. वासनेची भूक भागवण्यासाठी अशा व्यक्ती एखाद्याचा जीव घ्यायलाही मागेपुढा पाहत नाहीत. अशी घटना मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातून समोर आले आहे. एका महिलेने वासनेची भूक भागवण्यासाठी स्वतःच्याच लहान दीराला नादाला लावले. बाब जेव्हा पतीला समजली तेव्हा दोघांनी मिळून पतीलाच संपवले. तब्बल १८ दिवसांनी ४ वर्षांच्या मुलाने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलीसही हादरून गेले.

वाचा… त्या रात्री काय घडलं?
पणिहार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील धरोली गावात राहणाऱ्या मीरा (२३) नावाच्या महिलेचे तिचा दीर पुट्टू (२२) याच्याशी अनैतिक संबंध होते. मीरा जेव्हा जेव्हा त्याला भेटायला बोलवायची तेव्हा ती आधी दुधात झोपेच्या गोळ्या मिसळून पती शिवराज यादव (२५) याला प्यायला द्याची. नवरा गाढ झोपी गेल्यानंतर ती दीराला खोलूत बोलावून अनैतिक संबंध ठेवायची. २७ सप्टेंबरलाही महिलेने पतीला झोपेच्या गोळ्या घालून दूध दिले होते. नवरा झोपल्यानंतर तिने नेहमीप्रमाणे दीराला खोलीत बोलावले.
पण, त्या दिवशी तिने दुधात केवळ एकच गोळी घातली होती. त्यामुळे पतीला मधेच जाग आली आणि सगळाच भांडाफोड झाला. पत्नीला भावाच्या मिठीत पाहून पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण, गोळीच्या प्रभावामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते. हीच संधी साधून पत्नीनी आधी पतीचे हात-पाय बांधले आणि नंतर तोंडात कपडाचा बोळा कोंबला. त्यानंतर दीराच्या मदतीने तिने त्याला विजेच्या तारानेने शॉक दिला. जोपर्यंत तो पूर्णपणे मरत नाही, तोपर्यंत ती शॉक देत राहिली.

४ वर्षांच्या मुलामुळे झाला भांडाफोड
हे कृत्य करत असताना तिचा चार वर्षांचा मुलगा तिथेच होता. पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिने त्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा कांगावा केला. मात्र, शिवराजच्या वडिलांना ही बाब रुचली नाही. त्यांनी याविषयी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पण पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. जेव्हा ४ वर्षांच्या मुलाकडे चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आले. याच्याच आधारे पोलिसांनी मीरा आणि तिचा दीर पुट्टू या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






