जळगाव : नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रमात चॉकलेट वाटप केल्यानंतर घरी जाऊन विशाल तुकाराम चौधरी (२८, रा. अयोध्या नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
ही घटना शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अयोध्या नगरातील विशाल चौधरी हे कंपनीत कामाला होते. शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रौत्सवाच्या दांडिया कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते घरी गेले व घरात कुणीही नसताना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी हर्षाली या घरी आल्या त्या वेळी त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीला पाहताच त्यांनी हंबरडा फोडला.

यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेवून तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे, आकाश परदेशी करत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी एैशिका असा परिवार आहे.
शेवटचे घरी सोडून द्या, शेवटचे धन्यवाद….
विशालने आत्महत्या करण्यापूर्वी गरबा-दांडिया कार्यक्रमात सर्वांना चॉकलेट वाटल्या. त्यानंतर ‘मला शेवटचे घरी सोडून द्या’, असे मित्रांना सांगितले. त्यावेळी एका जणाने त्याला दुचाकीने घरी सोडले. त्यालादेखील ‘शेवटचे धन्यवाद’ असे म्हणून घरात निघून गेला. घरात गेल्यानंतर नव्या दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






