सोयगाव/साईदास पवार
सोयगाव :- तालुक्यातील गरजू आणि गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी तालुक्यात गावागावात आयुष्यमान भव आरोग्य योजने अंतर्गत सोयगाव तालुक्यात दर शनिवारी या योजनेचे शिबिर घेण्यात येईल अशी घोषणा शनिवारी (ता.२१)तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी केली दरम्यान सोयगाव तालुक्यात शनिवारी (ता.२१)सोयगाव ग्रामीण रुग्णालयसह प्राथमिक आरोग्य केंद्रात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
सोयगाव तालुक्यात दर शनिवारी हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्य मान भव कार्यक्रम अंतर्गत रुग्णांची मधुमेह, अति उचरक्तदाब, तपासणी करण्यात आली त्यावेळी वे्दीकीय अधिकारी डॉ सोनवने साहेब, डॉ महेश जाधव , औषधं निर्माण अधिकारी हर्षल विसपुते, आरोग्य सहायक अनिल जोहरे,आरोग्य सेवक श्रीराम चव्हाण, आरोग्य सेविका,संगीता वानखडे, शिंदे,कांचन बेंद्रे, निलेश वानखडे,सागर घायवत, ईश्वर निकम आदींची उपस्थिती होती….
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






