जळगाव :- 1999 मध्ये वडिलांचा खून करणाऱ्याचा तब्बल 24 वर्षांनी मुलाने बदला घेतला आहे. मुलाने व त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने लोखंडी पायपाने डोक्यात मारून संबधिताचा खून केला आहे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
भुसावळ येथील गवळीवाडा येथे राहणारे दस्तगीर गफुर गवळी यांचा 1999 रोजी मयत दिलीप रामलाल जोनवल यांनी खून केला होता. त्यांच्या मुलाने याचा गेल्या अनेक वर्षांपासून मनात राग धरून ठेवला होता. (दि. 25) च्या रात्री दिलीप जोंनवाल हा अकलूज येथून जेवण करून घरी येत असताना भुसावळ शहरातील गरुड प्लॉट भागातील क्रांती चौकात आला असता
संशयित आरोपी आदिल दस्तगीर खाटीक व साजिद सगीर खाटीक दोन्ही राहणार गवळीवाडा यांनी लोखंडी पाईपाने डोक्यात व हातावर मारहाण करून जखमी केले. यात दिलीप जोनवाल यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संग्राम जोनवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना भुसावळ शहर पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






