छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर धुळे कारागृहातील पोलिसाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना २०२० ते २०२३ या काळात घडली.
या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम नरेश गोसटकर (२५, रा. आडूळ, ता. पैठण) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, २५ वर्षीय पीडिता भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील आहे. २०२० पासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एन-१२, हडको भागात राहते. त्याचवेळी आरोपी शुभम गोसटकर हादेखील सर्प्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहत होता. एका अभ्यासिकेत त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते नेहमी भेटायचे. नोव्हेंबर २०२० मध्ये शुभमने पीडितेला स्वत:च्या खोलीवर बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो जेल पोलीस दलात भरती झाला. त्यानंतरही लग्नाचे आमिष दाखवून त्याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले.

नोकरी लागल्यावर दुसरीशी जुळले सूत
आरोपी शुभम गोसटकर याला कारागृह पोलीस दलात नोकरी लागल्यावर त्याचे दुसरीशी सूत जुळले. हा प्रकार पीडितेला समजल्यावर तिने लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अखेर, शुभमने पीडितेला लग्नास नकार दिला. त्यामुळे अखेर सिडको ठाण्यात शुभमविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






