शहादा :- पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांचा टोळीचा मागावर नजर ठेवून अखेर टोळीस बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सहा लाख ९० हजारांच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातून दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.
गेल्या १९ ऑक्टोबरला जिल्ह पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सातपिंप्री गावातील दशरथ खर्डे व त्याच्या साथीदारांनी नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच मोटारसायकलींची चोरी केली असून, खर्डे व त्याचा साथीदार चोरीची युनिकॉर्न मोटारसायकलीने प्रकाशामार्गे सातपिंप्री येथे त्याच्या घरी जात आहेत.
ही माहिती त्यांनी शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिली. श्री. बुधवंत यांनी पथक कारवाईसाठी रवाना केले. पथकाने प्रकाशा-शहादा रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्या वेळी दोन दुचाकीस्वार भरधाव येताना दिसले. पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळाले. पथकाला संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून त्यांना थांबविले. एक संशयित पळून गेला. एकास ताब्यात घेतले. त्याने नाव दशरथ खर्डे (वय २१) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकलीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
विश्वासात घेतल्याने त्याने चोरीची कबुली दिली. त्याने त्याचा साथीदार मुरा हिरला रावत (रा. अंजनबार, ता. सोंडवा, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) याच्या मदतीने शहादा, नंदुरबार, नवापूर, धुळे जिल्ह्यातील साक्री, मध्य प्रदेशातील इंदूर व गुजरात येथील छोटा उदयपूर येते चोरी केल्याचे सांगितले. पथकाने मध्य प्रदेशातून मुरा हिरला रावत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा लाख ९० हजारांच्या चार पल्सर, तीन युनिकॉर्न, अशा १५ दुचाकी जप्त केल्या.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






