Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ लोकांना खूप हसवतात; तर काही रडवतात. काही व्हिडीओ हे खूप हृदयस्पर्शी असतात; जे पाहून आपसूकच डोळ्यांतून पाणी येते.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुमचेही हृदय भरून येईल. या व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या पत्नीसह सायकवरबसून ब्रिज चढत आहे. यावेळी त्यांचा मुलगा सायकलला मागून ढकलत आहे. हे कुटुंब एका ओव्हरब्रिजवरून जात असल्याचे समजतेय. पण, अशा प्रकारे ब्रिज चढून जाताना वडिलांना जास्त मेहनत घ्यावी लागू नये म्हणून हा मुलगा स्वत: खाली उतरून सायकलला धक्का देत आहे. व्हिडीओतील हे दृश्य पाहून युजर्स भावूक झाले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या पत्नीसह ब्रिजवरून जात आहे. यावेळी ब्रिजवर चढताना सायकलला पेंडल मारण्यासाठी वडिलांना जास्त मेहनत घ्यावी लगतेय. अशाने वडिलांना जास्त त्रास होऊ नये म्हणून भरउन्हात त्यांचा लहान मुलगा मागून सायकल ढकलून त्यांना मदत करीत आहे. त्यामुळे वडिलांना आरामत सायकल पुढे नेता आली.
हा भावूक करणारा व्हिडीओ @abhaygiri21 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, स्माईल. या सुंदर व्हिडीओला दोन लाख ३९ हजार लाइक्स मिळाले आहेत; जो पाहिल्यानंतर काही युजर्स खूप भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला याची अद्याप पुष्टी झालेली नाही. पण, हा हृदयस्पर्शी क्षण पाहून तुम्हाला या मुलाचे आपल्या आई-वडिलांवर किती प्रेम आहे याची नक्कीच जाणीव झाली असेल. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, आतापर्यंतचा सर्वांत सुंदर व्हिडिओ. तर दुसऱ्या एक युजरने लिहिलेय की, देव प्रत्येकाला असा मुलगा देवो. त्याचप्रमाणे तिसऱ्या एका युजरने लिहिले की, व्हिडीओ काढण्याऐवजी मदत करायला हवी होती.






