झुंजार प्रतिनिधी। एरंडोल
एरंडोल- ग्राहकांनी वस्तूची खरेदी करतांना फसवणूक होणार नाही याची काळजी घेवून जागरूक राहावे असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले.जागतिक ग्राहक दिनानिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास पोलीस प्रशासन,नगरपालिका,वीज वितरण कंपनी,सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अनेक शासकीय कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याबद्दल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी सर्वांच्या सहभागातून कोणतीही चळवळ यशस्वी होत असल्याचे सांगितले.कोणत्याही वस्तूंची खरेदी करतांना शासकीय अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक ग्राहकच असल्याचे सांगितले.खोट्या व दिशाभूल करणा-या जाहिरातींपासून ग्राहकांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले.वस्तूची खरेदी करतांना त्याची गुणवत्ता पहावी असे सांगितले.ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.महसूल प्रशासन,पालिका,पोलीस प्रशासन यांच्या कामकाजाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
यावेळी जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य कैलास महाजन,प्रा.उज्वला देशपांडे,मुख्याध्यापिका शालिनी कोठावदे यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले.हरीश पांडे यांनी सुत्रसंचलन केले.ईश्वर बी-हाडे यांनी आभार मानले.कार्यक्रमास युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,नगरसेविका आरती महाजन,आरती ठाकूर,गौरी मानुधने,निवासी नायब तहसीलदार एस.पी.शिरसाठ,दक्षता समिती सदस्य परेश बिर्ला,स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगुजर,राजू वंजारी,सोनू ठाकूर,प्रशांत पाटील,डॉ.राखी काबरा,मालती पाटील,प्रणाली भोसले,मालती भूसनळे,सारिका राजपूत,भाऊसाहेब पाटील यांचेसह दक्षता समिती सदस्य,ग्राहक पंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी पुरवठा निरीक्षक संदीप निळे,अव्वल कारकून ज्ञानेश्वर राजपूत,हिशोब अव्वल कारकून नंदकिशोर वाघ,गोदाम व्यवस्थापक गोपाल शिरसाठ यांचेसह महसूल कर्मचा-यांनी सहकार्य केले.