पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा कवच एक प्रेरणादायी उपक्रम- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, २० पुरस्कार्थीचा होणार सन्मान.

Spread the love

जळगाव – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तर्फे दिनांक ३० रोजी अल्पबचत भवन,जळगाव येथे कार्यशाळा, पत्रकारांसाठी १० लाखाचा विमा वितरण व पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विमा कवच प्रेरणादायी उपक्रम असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यांची असणार उपस्थिती

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज,अधिस्वीकृती समिती(महाराष्ट्र शासन) अध्यक्ष श्री. यदु जोशी, मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे व संपूर्ण कार्यकारी मंडळ उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतं असलेल्या विमा कवच उपक्रम संघटनेच्या वतीने राज्यभर रबविणार असल्याचे वसंतराव मुंडे यांनी यावेळी सांगितले.

२० पुरस्कार्थीचा सन्मान

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व पत्रकारितेत दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान झाला पाहिजे या हेतूने दिनांक ३० रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच राज्यभर फिरत असताना मी असे बघितले की एका पत्रकाराचे दुर्दैवाने जर निधन झाले तर त्या पत्रकाराची परिस्थिती हलकीची असली तर त्याला इतरांसमोर हात पसरावा लागतो. त्या पत्रकाराला इतरांसमोर हात पसरावे लागू नये म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने जिल्ह्यातील सुमारे ३०० पत्रकारांचे दहा लाखांचा विमा काढण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवला आहे.

पत्रकार हा नेहमी इतरांच्या बाबतीत चांगले लिखाण करतो, त्याला न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करतो, मात्र स्वतःच्या बाबतीत कधीही दक्ष नसतो. महाराष्ट्रातील पत्रकारांची परिस्थिती ही खूप हलाखीची असल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी राज्यात पहिल्यांदा पत्रकारांना विमा कवच हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात सुरू केला.कोरोना काळात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून शासनाने जाहीर केले होते मात्र कोरोना काळात मृत्यू झालेल्या १५६ पत्रकारांपैकी एकाही मृत पावलेल्या पत्रकाराच्या परिवाराला मदत मिळाली नाही

याबाबत वसंतराव मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. आज वर्तमानपत्रांची किंमत प्रोडक्शन कॉस्ट नुसार खूपच कमी असल्याने पेपर छापण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने शासनाला एक मागणी अशी केली की महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत ने वर्तमानपत्रांची खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपयांची तरतूद करावी. असे प्रदेश अध्यक्ष श्री. मुंडे म्हणाले. तसेच कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्यासह, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, भगवान मराठे, संतोष नवले, दीपक सपकाळे, प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, सुरेश पवार ,संतोष राठोड आदी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार