२५ वर्षीय काकूंसोबत पुतण्याचे प्रेमसंबंध दोघेही बुडाले एकमेकांच्या प्रेमात; पण त्या दिवशी रात्री……..

Spread the love

पिलीभीत : प्रेम प्रकरण, अनैतिक संबंधांतून गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही प्रकरणांमध्ये हत्या, जबर मारहाणीसारखे प्रकार घडल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातल्या पिलीभीतमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे.
वाद आणि प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने त्याच्या चुलत्याची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयाच्या आधारे पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

पिलीभीत जिल्ह्यात चुलतीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या युवकाने त्याच्या चुलत्याची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी पुतण्याला अटक केली असून, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पुतण्या चुलतीशी दीड तास फोनवर बोलला; पण त्याने केलेल्या कृत्याची चाहूलही तिला लागून दिली नसल्याचं बोललं जात आहे, अमर उजालाने या बाबतचं वृत्त दिलं आहे. या बाबत एसपी अतुल शर्मा यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उगनपूर येथील रहिवासी नंदलाल (वय 28) याचा मृतदेह सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या शेतात आढळून आला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मॉर्टेमसाठी  पाठवला. त्यात नंदलालचा मृत्यू हा जखमांमुळे झाला असल्याचे स्पष्ट झालं. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला.’ मृत नंदलाल हा उत्तराखंडमधल्या रुद्रपूर येथील एका कारखान्यात मजुरी करत होता. त्याची पत्नी बरखेडातल्या दौलापूर येथे राहत होती. ही घटना घडण्यापूर्वी तीन दिवस नंदलाल गावी आला होता; पण चुलतीच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या त्याच्या पुतण्याने त्याचा जीव घेतला.

सुमारे एक वर्षांपूर्वी नंदलालला या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर काका आणि पुतण्या आकाश यांच्यात वाद झाला होता. घटनेच्या दिवशी रात्री दोघांमध्ये घराबाहेर पुन्हा वाद झाला. त्यावेळी आकाशने नंदलालच्या डोक्यात जोरात काठीने प्रहार केला. यात नंदलालचा जागीच मृत्यू झाला. चुलत्याची हत्या केल्यानंतर आकाश रात्री घरी येऊन झोपला. थोड्यावेळाने त्यान बाहेर येऊन पाहिले तर नंदलालचा मृतदेह घटनास्थळीच पडला होता.

आरोपीच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेली काठी पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, संशयावरून पोलिसांनी नंदलालचा पुतण्या आकाशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात आकाशने त्याचा चुलता नंदलालची हत्या केल्याचे कबूल केले. माझे नंदलालच्या पत्नीसोबत अफेअर होतं, असं आकाशनं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार