पीक विम्याचे पैसे का मिळत नाही यासाठी शेतकऱ्यांनी दोन्ही मंत्रांचा ताफा अडवून विचारला जाब.
दोन्ही मंत्रांच्या उपस्थितीत शेतकरी चर्चा करीत असताना गोंधळ घालणाऱ्या शिवाजी पाटील यांच्यावर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी | अमळनेर
आमचा तालुका दुष्काळी का जाहीर झाला नाही , पीक विम्याचे पैसे का मिळत नाहीत अशी विचारणा शेतकरी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना करीत असताना अचानक एक जण मागाहून हे काहीच करणार नाही रे असे उपरोधिक शब्द वापरले त्यावेळी मंत्री गुलाबराव संतापले अन म्हणाले आम्ही बालपणापासून आंदोलन केले आहे , मी आधी रस्त्यावरचा आहे. मग नंतर मंत्री आहे.
तापी नदीवरील श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिराच्या सभागृह आणि पांझरा नदीवरील पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सोबतच मारवड मार्गे कपिलेश्वर मंदिरावर जात असताना
मारवड गावात शेतकरी नेते शिवाजी पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या वाहनाचा ताफा आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी अडवला. अमळनेर तालुक्यात अनेक दिवस पावसाचा खंड होता ,पुरेसा पाऊस पडला नाही तरी अद्याप तालुका दुष्काळी का जाहीर होत नाही ,शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तीन महिने उलटले तरी मिळत नाही अशा मागणीचे निवेदन दोघा मंत्र्यांना दिले. त्यावेळी कायदेशीर बाबी मंत्री अनिल पाटील गुलाबरावांना शेतकऱ्यांसमवेत समजावून सांगत असताना मध्येच एकाने असे उपरोधात्मक वक्तव्य केल्याने गुलाबराव संतापले. त्यावर शिवाजी पाटील यांनी तुम्ही मंत्री आहात भडकू नका म्हणून सांगितल्यावर दोघांमध्ये खडाजंगी झाली.

शाब्दिक चकमक जोरात होऊ लागताच मंत्री अनिल पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला. यावेळी काही नागरिकानी व्हिडीओ चित्रिकरण देखील केले. काही शेतकऱ्यांनी शिवाजी पाटील यांना वाद वाढवून प्रश्न सुटणार नाही म्हणून सांगत शिवाजी पाटील यांयांची साथ सोडली ,पोलिसांनी अधिक वाद होऊ नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवाजी पाटील यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. व दोन्ही मंत्र्यांचा ताफा पाडळसरे गावी पालकमंत्र्यांचे मामे भाऊ कडील द्वारदर्शन व नंतर कपिलेश्वर कडे रवाना झाला.
दरम्यान गुलाबराव पाटील यांनी मंत्री असतानाही दमदाटी केली व दंड थोपटून आव्हान दिल्याचा तर अनिल पाटील यांनीही दमबाजी केल्याचा आरोप शिवाजी पाटील यांनी केला.
दरम्यान शिवाजी पाटील यांनी बेकायदेशीर रस्ता अडवला म्हणून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याचे मारवड पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी दिव्य मराठीकडे सांगितले.

कोट – १) शेतकऱ्यांचे म्हणणे शांततेने ऐकून घेत असताना व कायदेशीर प्रक्रियेवर चर्चा करताना शिवाजी पाटील यांनी विनाकारण गोंधळ घातला. – अनिल पाटील ,मदत व पुनर्वसन मंत्री
२ ) शेतकऱ्यांचा विषयी आम्हाला ही कळवळा आहे मात्र शेतकऱ्यांच्या आडून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या चिंधीचोर व शेतकऱ्यांच्या आडून राजकारण केले व त्याबाबत हमरीतुमरीवर येऊन बेकायदा आंदोलन करून गोंधळ निर्माण करणाऱ्याना शेतकरी ओळखून आहेत–पालकमंत्री गुलाबराव पाटील
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम