कोपरगाव :- इन्स्टाग्रावर ओळख झालेल्या एका अल्पवयीन मुलीला तरुणाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. गुजरातच्या सूरतमध्ये हा प्रकार घडला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरूण हा मूळचा महाराष्ट्रातील नगरचा असून तो त्याच्या मामाच्या गॅरेजमध्ये कामाला आहे. मुशेद जमशेद मणियार नावाच्या तरुणाची पूजा (बदललेले नाव)शी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.
ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मुशेदला पूजासोबत त्याच्या वाढदिवस साजरा करायचा होता. यासाठी दोघांनी भेटायचं ठरवलं होतं. नगरहून मुशेद सूरतला आला होता. त्याने आणि पूजाने मिळून हॉटेलच्या एका खोलीत वाढदिवस साजरा केला. यानंतर मुशेद आणि पूजा मुंबईला आले आणि तिथून ते अजमेरला गेले होते.पूजाच्या घरच्यांना याची जराही कल्पना नव्हती. पूजाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी पूजाचा शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यांनी पूजाच्या मोबाईलचे लोकशन शोधून काढले आणि त्यांना तिचे शेवटचे लोकेशन अहमदाबादच्या कालुपूर रेल्वे स्टेशन दिसले होते. यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत पूजाला ताब्यात घेतले आणि मुशेदला अटक केली. पूजाने केलल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मुशेदविरोधात अपहरण आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे वय 21 वर्षे असून तो कोपरगावात त्याच्या मामाच्या गॅरेज मध्ये काम करतो. मुशेदने पूजावर बलात्कार केला आहे का याचाही तपास केला जात असून , तसे निष्पन्न झाल्यास मुशेदवर आणखी बलात्काराचाही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






