जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
श्रीगणेश आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य खराब होईल. वेळेवर जेवणसुद्धा मिळणार नाही. व्यर्थ खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणाचा दृष्टीकोन ठेवा तेच फायदेशीर राहील. श्रीगणेश सांगतात आजचा दिवस तुम्हाला सामान्य दिवस आहे.
वृषभ:
श्रीगणेश कृपेने आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभही होऊ शकतो. कुटुंबा बरोबर आनंदात वेळ घालवाल. नवे कपडे, दागिने आज खरेदी कराल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
मिथुन:
आज आपण आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावधान राहा असे श्रीगणेश सांगतात. आपल्या बोलाचालीत काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून सावध राहा. ईश्वरभक्ती आणि अध्यात्म यानेच मनाला शांती मिळेल.
कर्क:
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल. नोकरी धंद्यात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांबरोबर प्रवासाला जाऊ शकता. प्रिय व्यक्तींबरोबर चांगला वेळ घालवाल. आर्थिक योजना यशस्वी कराल. विवाहोत्सुकासाठी विवाहयोग आहे. शरीर व मन स्वस्थ राहील.
सिंह:
आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल याच्या मदतीने सगळी कामे यशस्वी कराल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय धंदयात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नतीचे योग येऊ शकतात. वरिष्ठांना तुमच्या कामाने प्रभावित कराल. पित्याच्या बाजूने फायदा होऊ शकतो. वाहन आणि संपत्ती या संबंधी कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात ही यश मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.
कन्या:
श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्या नातेवाईकांच्या वार्ता समजतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक सहली यासाठी खर्च होईल. बहीण- भावाकडून फायदा होण्याची शक्यता. परदेशात जाऊ इच्छिणार्यांना परदेशात जायला अनुकूल काळ आहे.

तूळ:
कोणत्याही नवीन कामाचा आज आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. हितशत्रूपासून सावधान. तब्येतीची चांगली काळजी घ्या. गूढ विद्येकडे आकर्षण वाढेल. सिद्धी- साधना साठी आजचा दिवस चांगला आहे. खूप प्रयत्नांनी मानसिक शांती प्राप्त होईल.
वृश्चिक:
आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल.
धनु:
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभ जाईल. स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबिया समवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखलच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांशी मुलाकात होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.

मकर:
आज आपण मनाने खूप अशांत व असमंजसपणाने राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही, त्यामुळे तणावात राहाल. श्रीगणेश सल्ला देतात की कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. नशीब आज तुमच्याबरोबर नाही, त्यामुळे तुम्ही निराश असाल. संतती विषयी चिंतीत असाल. घरातील थोरांची तब्बेत खराब होऊ शकते. शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांबरोबर वादविवाद टाळा. पोटाचे दुखणे डोके वर काढील
कुंभ:
श्रीगणेश म्हणतात की अधिक संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्थावर- संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावधानी बाळगा. सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी महिलांचा खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
मीन:-
महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. मित्रांसोबत प्रवास- पर्यटन कराल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान- सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






