जळगाव :- शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता अटक केली आहे.त्यांच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तून आणि ४ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरात राहणारा संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे (वय-३४) हा शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर हातात गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक किशोर निकुंभ आणि पो.कॉ. तेजस मराठे यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी पथकाने दुपारी अडीच वाजता कारवाई करत नवजीवन कलेक्शन दुकानासमोरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे याला अटक केली. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि ४ हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सुचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या

मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, पोहेकॉ राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, उमेश भांडारकर, संतोष खवले, पोलीस नाईक किशोर निकुंभ, योगेश पाटील, पोकॉ रतन गिते, , पो.कॉ.तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






