मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जामनेर येथे मराठा समाजाचा आक्रोश.

Spread the love

घोषणाबाजीने जामनेर शहर दणाणले एसटीच्या जाहिरातीवरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला काळे फासले
जामनेर(प्रतिनिधी):-
शांततेच्या मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण सुरू असताना आता मराठा समाजाची आक्रमकता सर्वत्र वाढीला दिसून येत आहे. मराठा समाज योद्धा वीर मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून जामनेर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मराठा आरक्षण व मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सन्मानार्थ सकल मराठा समाज जामनेर तालुक्यातर्फे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंञी ,मोदीच्या फोटोला काळे लावुन आरक्षण विरोधी सरकारचा निषेध करण्यात आला ..!
एक मराठा लाख मराठा ,जय जिजाऊ..जय शिवराय, फडणवीस मुर्दाबाद घोषणांनी बस स्थानक परीसर दणाणला ! कोणत्याही प्रकारची अहिंसक कृती न करता शांततेच्या मार्गाने आक्रमक स्वरूपात मराठा आरक्षण आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाचे प्रणेते वीर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून जामनेर तालुक्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मनोजकुमार महाले ,प्रदीप गायके ,जीवन सपकाळ,राहुल चव्हाण,राम अपार,जितेंद्र पाटील ,प्रल्हाद बोरसे,प्रकाशदादा पाटील ,आकाश बंडे,प्रशांत पाटील, रवि बंडे, गौरव काळे,दिलीप सांळुखे यांच्यासह जामनेर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार