सांडपाण्याच्या पाईपला धरून थेट हॉटेलचा चौथा मजल्यावरील खोलीत शिरला अन् महिलेकडं थेट शारीरिक संबंधांची केली मागणी.

Spread the love

अहमदाबाद : टपोरी तरुणांचं गैरवर्तन, येता-जाता तरुणींची किंवा महिलांची होणारी छेडछाड व विनयभंगाच्या बातम्या अधूनमधून येत असतात. मात्र, गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडलेली घटना वेगळी आणि धक्कादायक आहे.अहमदाबादमधील एका ३१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. विनयभंगाच्या आरोपाखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणानं रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या महिलेचा विनयभंग केलेला नाही, तर त्यासाठी त्यानं सांडपाण्याच्या पाईपला धरून थेट हॉटेलचा चौथा मजला गाठल्याचं समोर आलं आहे.

एका महिलेच्या मागावर असलेला हा भामटा हॉटेलच्या खोलीत शिरला आणि त्यानं संंबंधित महिलेकडं थेट शारीरिक संबंधांची मागणी केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार २६ वर्षीय पीडित महिलेनं नरोडा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार केली आहे. त्यानुसार, घरात काहीतरी काम सुरू असल्यामुळं पीडित तरुणी मागच्या दीड महिन्यांपासून नरोडा-मुथिया भागात असलेल्या हॉटेलमध्ये राहते. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा पती नाष्टा आणण्यासाठी खाली गेला होता.

तेव्हा तिला खिडकीजवळ काहीतरी हालचाल जाणवली. ती बघायला जाणार इतक्यात आरोपीनं खिडकीतून तिच्या खोलीत उडी मारली. त्यामुळं ती गोंधळून गेली. ती सावरण्याच्या आत आरोपीनं तिच्याकडं सेक्सची मागणी केली. पीडित तरुणीला धक्काच बसला. ती संतापली. तिनं त्याला नकार दिला. त्यामुळं आरोपी तिला त्रास देऊ लागला. अखेर तरुणीनं मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर हॉटेलचे कर्मचारी आणि तिचा नवरा धावत आला. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार सुरुवातीला आरोपीनं तिच्यावर आणि तिच्या पतीवर हल्ला केला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. पार्थ पटेल असं आरोपी तरुणाचं नाव असून तो सरदारनगर येथील रहिवासी आहे. नरोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक एसजे भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल हा रोजंदारी काम करतो. तो अनेक दिवस तक्रारदार पीडित तरुणीवर लक्ष ठेवून होता. पोलिसांनी पकडल्यानंतरही त्यानं पीडित तरुणीला शिवीगाळ करत तिच्या पतीवर हल्ला करण्याची धमकी दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार