गोवंश जनावरांची कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्या दोघांना चाळीसगांव शहर पोलीसांनी घेतले ताब्यात…

Spread the love

चाळीसगांव :- शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना चाळीसगांव शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होतो याबाबत संशय होता म्हणुन सदर परिसरात रात्रौच्या वेळी सतर्कतेने गस्त करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या होत्या.

आज दिनांक 01/11/2023 रोजी रात्री 23.00 वाजेच्या सुमारास सपोनि/सागर ढिकले, पोहेकॉ/नितीश पाटील, पोना/भुषण पाटील, पोशि/विजय पाटील, पोशि/पवन पाटील,पोना/राकेश पाटील, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/राकेश महाजन, पोकॉ/पवन पाटील, पोकॉ/आशुतोष सोनवणे असे शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना चाळीसगांव शहरातील मदिना मस्जीद जवळ, डॉ झाकीर हुसेन सोसायटी परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्री होत असल्याबाबत पोकॉ/आशुतोष सोणवणे यांना माहीती मिळाल्याने

त्यांनी पोनि/संदीप पाटील व वरील पोलीस स्टाफला कळवुन, गुन्ह्यास लागणारे साहीत्य व पंचासह दिनांक 02/11/2023 रोजी 00.30 वाजता बातमीतील परीसरात जावुन, बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार नवागाव ते चौधरीवाडा रोडच्या कडेला असलेल्या सलीम खान ईस्माईल खान कुरेशी याच्या मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये दोन इसम एका गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल करुन कुऱ्हाड व सुऱ्याने मांस कापत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नावगांव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1) रिजवान खान सलीम खान कुरेशी, वय 23 वर्षे, 2) इरफान खान सलीम खान वय 23 वर्षे, दोघे रा. मदिना मस्जीद जवळ, डॉ झाकीर हुसेन सोसायटी, चाळीसगाव असे सांगितले.

सपोनि/सागर ढिकले यांनी लागलीच पंचासमक्ष पंचनामा करुन एकुण 8,000/- रुपये किमतीचे 80 किलो गोवंश जातीचे जनावराचे मांस, 2000 रुपये किमतीचा ताण काटा, 500 रुपये किमतीची 01 कुऱ्हाड, 100 रुपये किमतीची 01 सुरी असा एकुण 10,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल सदर ठिकाणावरुन जप्त करुन, नमुद इसमांविरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. गु.र.नं. 512/2023 महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम सन 2015 चे सुधारीत कलम 5 (क) चे उल्लघंन 9 व भारतीय प्राणी सरंक्षण कायदा 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिल कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राजकुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे, मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, तसेच सपोनि/सागर ढिकले, पोहेकॉ/नितीश पाटील, पोना/भुषण पाटील, पोशि/विजय पाटील, पोशि/पवन पाटील,पोना/राकेश पाटील, पोकॉ/रविंद्र बच्छे, पोकॉ/राकेश महाजन, पोकॉ/पवन पाटील, पोकॉ/आशुतोष सोनवणे सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सागर ढिकले, सहा.पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार