बदायू : आज देशभरात सौभाग्याचं प्रतीक असलेला करवा चौथ साजरा केला जात आहे. मात्र, याच दिवशी उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एका पत्नीच्या बेवफाईचे प्रकरण समोर आले आहे. महिलेचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते.
अल्पवयीन दीर आणि महिला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल होते. नवरा घराबाहेर गेला की हे दोघे एकत्र येत. पण एके दिवशी अचानक नवऱ्याने त्यांना रंगेहाथ पडकले. हे दृष्य पाहून संतापलेल्या पतीने आपल्या नात्याचा भयानक शेवट केला.
बदायू मधील बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदगंज गावात हे प्रकरण घडले. येथे एक विवाहित महिला आणि तिचा 16 वर्षीय दीर यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर अनैतिक संबंधात बदललं. पती घराबाहेर गेला की वहिनी आपल्या दिरासोबत खोलीत वेळ घालवत असे. दरम्यान, वहिनी आणि दिराची खोलीत मस्ती सुरू असतानाच नवरा तिथं आला. त्याने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यामुळे त्याचे पित्त खवळले. त्याने पत्नी आणि भावाला समजावून सांगितले. या घटनेनंतर दोन्ही भावांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

शेतात आढळला मृतदेह……
अहमदगंज गावात बाजरीच्या शेतात 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्यात स्कार्फ होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या वडिलांनी सांगितले की, तो 23 ऑक्टोबरला अचानक बेपत्ता झाला होता. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. विद्यार्थी आणि त्याचा मोठा भाऊ यांच्यात अनेकदा घरगुती वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वीही दोघांमध्ये खूप शिवीगाळ झाली होती.

आरोपीला अटक…….
संशयाच्या आधारे पोलिसांनी मृताच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने पोलिसांना सांगितले की, 23 ऑक्टोबर रोजी तो त्याच्या भावाला औषध देण्याच्या बहाण्याने परौली येथे घेऊन गेला होता. यावेळी निर्जन जागा पाहून दोन्ही भावांनी एकत्र बसून गांजा ओढला. त्यानंतर आरोपीने लहान भावाचा टॉवेलने गळा आवळून खून केला. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांमुळेच त्याने लहान भावाची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






