धक्कादायक!दोन मुलांची आई प्रियकरासोबत गेली ओयो हॉटेलच्या रूममध्ये; चार तास झाले बाहेर आलेच नाही,काय झाल मग वाचा.

Spread the love

नवी दिल्ली : ओयो हॉटेलमध्ये एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. दोन मुलांची आई असलेल्या महिलेसोबत तरुण आला होता. चार तासांसाठी त्यांनी ओयो रूम बूक केली होती. मात्र चार तासानंतरही ते बाहेर न आल्याने ओयो हॉटेल चालकाने पोलिसांना बोलावले. तेव्हा तरुण पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता तर महिला फरशीवर मृतावस्थेत पडली होती. तिच्या गळ्यावर खुणा होत्या.

पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोटही सापडली असून त्यात दोघांनी आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. दिल्लीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ जाफराबाद इथं ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोहराब आणि आयशा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण आयशा विवाहित होती आणि तिला दोन लहान मुलेही आहेत. दोघांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हॉटेलमध्ये चेक इन केलं.

सायंकाळी आठ वाजेपर्यंत त्यांनी वेटर्सना काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा हॉटेल स्टाफने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफराबाद पोलिसांना शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास मेट्रो स्टेशनजवळच्या हॉटेलमधून कॉल आला. एक खोली उघडत नसल्याचं सांगण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी खोली उघडली. तेव्हा सोहराबचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता तर आय़शा खाली पडली होती.

तिच्या मानेवर जखमेचे व्रण होते.पोलिसांनी सांगितले की, सोहराब युपीतील मेरठचा आहे. त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलेचा पती घटनास्थळी दाखल झाला. आपण सोहराबला ओळखत नाही असं त्याने म्हटलं. पोलिसांनी खोलीचा तपास केला असून आयशाच्या बाजूला हिंदीत सुसाइड नोट आढळली आहे. दोघांनी सोबतच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यात म्हटलं आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार