एका प्रेमीयुगुलाने एकाच ओढणीने गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा.

Spread the love

पुणे: प्रेमीयुगुलाने एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली मधील एका लॉजमध्ये घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सचिन गोकुळ शिंदे (वय-21 सध्या रा. खराडी, मुळ रा. नेहरु कॉलनी, भिंगार, अहमदनगर) आणि कोमल सुनील बर्के (वय-20 रा. चंदननगर, खराडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
सचिन आणि कोमल हे दोघे सकळी अकराच्या सुमारास लॉजमध्ये आले होते. सायंकाळी सहा वाजता खोली सोडणार होते.

मात्र, सहा वाजून गेल्यानंतरही त्यांनी खोली सोडली नाही. त्यामुळे लॉज मधील कर्मचाऱ्यांनी सचिनच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी खोलीजवळ जाऊन बेल वाजवली. परंतु आतुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा ढकलला.

कामगारांनी दरवाजा उघडला असता सचिन आणि कोमल यांनी एकाच ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रेमप्रकरणातून दोघांनी जीवन संपवलं असल्याचा
प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोमल ही डी-एमएलटी चे शिक्षण घेत होती.
तर सचिन पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु करत आहेत.

हे पण वाचा


टीम झुंजार