एरंडोल :- विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान करून नेतृत्व करण्याची संधी दिली आहे,मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाच्या माध्यमातून
मतदारसंघात विविध विकासकामे करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून मतदारांच्या चेह-यावर दिसणारे समाधान हीच खरी आमची शक्ती व प्रेरणा
असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.शहरात सुमारे चार कोटी रुपये खर्च करून मंजूर झालेल्या विविध रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जुना धरणगाव रस्ता,दादासाहेब पाटील महाविद्यालय ते विखरण फाटा रस्ता आणि जुना कासोदा रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन आमदार
चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी आमदार चिमणराव पाटील यांचेसह पदाधिका-यांचे आगमन होताच नागरिकांनी फटाक्यांची आतीषबाजी केली.तसेच महिलांनी आमदार पाटील यांचेसह पदाधिका-यांचे औक्षण केले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सोयी व सुविधा उपलब्ध करून देणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे सांगितले. सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती पाहता राजकारणाचे शुद्धीकरण होणे गरजेचे असल्याचे सांगितले.मतदारांनी विश्वास दाखवला असल्यामुळे विकासकामांच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असल्याचे सांगितले. मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांची क्षमता,चारित्र्य पाहून मतदान करावे असे आवाहन केले.

शहरात तीन वर्षात सुमारे शंभर कोटी रुपयांची विकासकामे सुरु असून आगामी काळात देखील विकासाची घौडदौड अशीच वेगाने सुरु राहील असा
विश्वास व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत) यांनी सुत्रसंचलन केले. तालुकाप्रमुख रवींद्र जाधव यांनी आभार मानले.

कार्यक्रमास तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुका संघटक संभाजी पाटील,शहर संघटक मयूर महाजन,समन्वयक प्रवराज पाटील,टोळीचे सरपंच बाळासाहेब पाटील,चिंतामण पाटील,युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,शहरप्रमुख कृष्णा ओतारी,माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर,गोविंदा राठोड,गौरव पाटील,आर.जी.पाटील,गोविंदा बिर्ला,काशिनाथ म्हस्के,बबन पाटील,शरद ठाकूर,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,शाखा अभियंता नितीन पाटील यांचेसह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






