महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कुसुंबा बु.येथे कापूस पिकाची शेती शाळा वर्गाचे आयोजन

Spread the love

पाल l प्रतिनिधी (संतोष राठोड):- कुसुंबा बुद्रुक येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन २०२३-२४ अंतर्गत उत्पादकता वाढीवर कापूस पिकाची शेती शाळा वर्गाचे आयोजन मदन सुरेश पंडित यांच्या शेतात केले
उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत श्री संदीप बारेला कृषी सहाय्यक यांनी आयसीएम टाळी वाजवून केले कार्यक्रमाची रूपरेषा बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली

याप्रसंगी शेतकऱ्यांना श्री महेश महाजन वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी काढण पश्चात तंत्रज्ञान व साठवणूक या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले तसेच कार्यक्रमाला श्री अतुल पाटील सर वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल श्री ललित अरुण इंगळे मंडळ कृषी अधिकारी पाल व श्री जगदिश देशमुख कृषी पर्यवेक्षक पाल उपस्तीत होते

तसेच प्रगतिशील शेतकरी श्री मदन सुरेश पंडित तसेच श्री रामकृष्ण डिगंबर महाजन उपस्तीत होते
तसेच शेतकऱ्यांना अल्पोहार देण्यात आला. शेतकऱ्यांचे आभार मानून पुढील वर्गास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संदीप बारेला कृषी सहाय्यक यांनी केले.

हे पण वाचा

टीम झुंजार