यावल :- शहरातील विरार नगर व मदीनानगर या भागात दोन ठिकाणी घरफोडी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी या घरातुन रोख रक्कम सह दागीने लांबवले आहे. तर या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत एका संशयीताला अटक करण्यात आली आहे.
यावल शहरातील हरिओम नगर शेजारी मदीना नगर आहे येथील रहिवासी रफीक खान नामदार खान याच्या घरात घरफोडी झाली मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
दुसऱ्या एका घटनेत शहरातील विस्तारित भागातील विरार नगर या ठीकाणी राहणाऱ्या पुष्पा विजय अहिरराव यांच्या दरवाज्याचे कुलुप तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे दोन्ही ठिकाणी चोरीत एकुण ६ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रफीक खान यांच्या फिर्यादी वरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे.

हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






