पारोळा : – दि.२५ सप्टेबर २०२३ रोजी पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी इतर शहरांप्रमाणे पारोळा शहरात देखील मेडीकल असोसिएशनची हक्काची वास्तु साकारण्यात यावी, या मागणी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांची भेट घेतली होती.
या भेटी वेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमातुन लवकरच आपणांस केमिस्ट भवन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मा.अमोलदादा पाटील यांनी ठोस आश्वासित केले होते. त्याची वचनपुर्ती म्हणुन आज दि.०५ नोव्हेंबर रोजी मा.अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन पारोळा मेडीकल असोसिएशनच्या अद्ययावत वास्तु बांधकामाचा भव्य भुमीपुजन सोहळा मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मा.नगराध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोहरा, मा.नगरसेवक मनिष पाटील यांचेसह पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व पारोळा तालुक्यातील औषध विक्रेते उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम