पाल ता रावेर वार्ताहर :- दि ६/११२०२३:- तीर्थक्षेत्र वाराणसी (काशी). येथे आयोजित अखील भारतीय संत समिती ,अखील भारतीय अखाड़ा परिषद , गंगा महासभा , दैनिक जागरण , काशी विद्वत परिषद , यांच्या संयुक्त विद्यामने चार दिवसीय संस्कृति संसद संत सम्मेलन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले त्यामध्ये भारतातून हजारों संतांच्या उपस्थिति व सिक्किम चे माननीय राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य जी , अखाड़ा परिषदाचे अध्यक्ष रविंदरपुरी जी महाराज , अखिल भारतीय संत समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य जगद्गुरु अविचलदेवाचार्य जी महराज यांच्या प्रमुख उपस्थितीत परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी चे कृपापात्र शिष्य व अखील भारतीय चैतन्य साधक परिवार श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांची अखील भारतीय संत समिती च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.
यावेळी समिति चे राष्ट्रीय महामंत्री,जितेंद्रानंदजी महाराज अखिल भारतीय संत समिती चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज , अखिल भारतीय संत समिती चे संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर राधे राधे बाबा आदि सह देशभरातील हजारो संत महंत महामंडलेश्वर जगद्गुरु उपस्थित होते.

ब्रम्हलिन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी चे कृपा पात्र शिष्य श्रद्येय संत श्री चैतन्य गोपाल चैतन्य जी महाराज यानी गुरुवर्य पूज्य बापूजी यांच्या ब्रम्हलीनानंतर त्यांच्या प्रेरणेने व अखील भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या सहयोगाने सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले लाखो आदिवासी बाँधवासह भाविकाना आघ्यात्मिक क्षेत्रात आणून शुद्ध शाकाहार जीवन व अंधश्रद्धा मुक्तीचे अनमोल कार्य करून उत्कृष्ट जीवन जगण्याचे मार्ग आपल्या सत्संग अमृताच्या व पूज्य बापूजी च्या संकल्पनेतून निर्मित निरतंर सुरु असलेल्या गतिविधि च्या माध्यमातून दाखविले असुन असेच महान कार्य देशभरात अखील भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या सहयोगाने सुरु असुन या महान कार्याची पावती म्हणुन त्यांना अखील भारतीय संत समिति चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद बहाल करण्यात आले.

यामुळे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार मध्ये चैतन्य मय आनंदित वातावरण निर्माण झाले असून सगळी कडून कौतुक करण्यात येत आहे.
या आनंदमय क्षणात पूज्य बापूजिचे कृपापात्र शिष्य श्याम चैतन्य महाराज जामनेर व पाल आश्रमातून दिव्य चेतन्य महाराज, शिव चैतन्य महाराज, ब्रज चैतन्य महाराज, सर्व चैतन्य महाराज
व हजारों संत, महापुरुष ,अनेक धर्माचार्य,अनेक संप्रदाय चे मंडलेश्वर,महामंडलेश्वर यांची प्रामुख्याने विशेष उपस्थिति होती.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






