पळून केला घरच्यांच्या इच्छेविरोधात प्रेमविवाह, तीनदिवसात नवविवाहित जोडप्यासोबत घडलं भयंकर वाचा.

Spread the love

थुथुकडी(तामिळनाडू):- घरच्यांच्या इच्छेविरोधात प्रेमविवाह केल्याने लग्नाच्या ३ दिवसांनंतर नवविवाहित जोडप्याची हत्या करण्यात आली. तामिळनाडूमध्ये ही हादरवुन टाकणारी घटना घडली आहे. ही हत्या कुणी केली, हे स्पष्ट झाले नसून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सध्या या हत्यांकांडाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूच्या (Tamil Nadu) थुथुकडी भागात नवविवाहित दांपत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. व्ही मारिसेल्वम (२४) आणि एम कार्तिगा (२०) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.कार्तिगा हा श्रीमंत कुटुंबातील होता आणि मेरीसेल्वम गरीब होती. त्यामुळे या लग्नाला कार्तिगाच्या घरचांचा विरोध होता. मात्र पालकांचा तीव्र विरोध असूनही दोघांनी घरातून पळ काढला आणि 30 ऑक्टोबर रोजी कोविलपट्टीजवळील एका मंदिरात लग्न केले.

लग्नानंतर हे जोडपे गुरुवारी मुरुगेसन नगर येथे परतले. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात हल्लेखोरांनी दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांची निर्घृण हत्या केली. ही हत्या कोणी केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र कार्तिकच्या नातेवाईकांनीच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुखी संसाराचे स्वप्न पाहिलेल्या या लवस्टोरीचा भयानक अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे..

हे पण वाचा

टीम झुंजार