धक्कादायक! कोरोनाकाळात तिच्या आईच्या मृत्यू तरुणाशी झाली ओळख,लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये अत्याचार, नतंर त्याने जे केले ते आश्चर्य वाटेल.

Spread the love

नागपूर : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या अनेकांची आपल्या पार्टनरकडून फसवणूक झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. यामध्ये प्रियकर असो की प्रेयसी अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. त्यातच आता नागपूरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या आईच्या नावावर कर्ज उचलल्याची घटना समोर आली आहे.

प्रफुल्ल रामचंद्र बले (वय35, पिरॅमिड सिटी, बेलतरोडी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.प्रफुल्ल रामचंद्र बले याची कोरोनाकाळात 24 वर्षीय तरुणीशी ओळख झाली होती. या तरुणीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यादरम्यान, प्रुफल्लने तिला आधार दिला. दोघांमध्ये मैत्री झाली. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तसेच प्रफुल्लने तिला लग्नाचे आमिषही दाखवले.14 एप्रिल 2021 पासून फेब्रुवारी 2023 पर्यंत त्याने तिच्यावर अत्याचारही केले.

तसेच याच कालावधीमध्ये प्रफुल्लने त्याच्या प्रेयसीच्या आईचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून वेगवेगळ्या लोन अॅपवरुन दीड लाखांचे कर्जही घेतले. यानंतर काही महिन्यांनी बँकेतून कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर तरुणीला आश्चर्य वाटले.माझ्या आईचा मृत्यू झालेला असताना ती कर्ज कसे घेऊ शकते, असा सवाल तिने बँक अधिकाऱ्यांना विचारला असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार