Viral Video: उत्तर प्रदेशातील औरेयामधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. औरेयामध्ये रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे भावाला चक्क आपल्या बहिणीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जावा लागला आहे.
त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओत औरेयामधील बिधुता कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे बुधवारी सकाळी (दि.8) सदर घटना घडलीये. या रुग्णालयातील एक तरुण आपल्या बहिणीचा मृतदेह दुचाकीवर बसवताना दिसत आहे. या व्हिडिओत आपल्याला त्या भावाचं बहिणीवरील प्रेम दिसून येत आहे.

मृत महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय…?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी घरी पाणी गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत रॉडचा शॉक लागला होता. यामुळे तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. मात्र तिच्या भावाला आपल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे यावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे त्याने तिला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. यामुळे तरुणीच्या भावाला त्याच्याच दुचाकीवरून दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले.

@INCUttarPradeshया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसंच या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील आरोग्यसेवेची झालेली दुरवस्था समोर आली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात यावा. तसेच यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे
हे पण वाचा






