एरंडोल तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीच्या धनादेशाचे आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते वितरण.

Spread the love

एरंडोल :- तालुक्यातील भातखेडे,पिंप्री बुद्रुक,टोळी खुर्द,भालगाव बुद्रुक,हणमंतखेडे बुद्रुक, कासोदा येथील कर्जामुळे आणि नापिकीला कंटाळून शेतक-यांनी केलेल्या आत्महत्या,नैसर्गिक आपत्तीत मयत व जखमी झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

तहसीलदार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पिंप्री बुद्रुक येथील कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या नितीन कृष्णराव पाटील यांच्या पत्नी साधना नितीन पाटील,टोळी बुद्रुक येथील नामदेव भिला मराठे यांच्या पत्नी कल्पनाबाई नामदेव मराठे आणि भालगाव बुद्रुक येथील शालिक वामन पाटील यांच्या पत्नी सुरेखा शालिक पाटील यांना प्रत्येकी एका लाख रुपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

तसेच पावसामुळे भातखेडे येथील घराची भिंत कोसळून जखमी झालेल्या सारिका योगेश पाटील,हर्शल योगेश पाटील आणि नितीन प्रमोद पाटील यांना प्रत्येकी ५ हजार ४०० रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले. हनुमंतखेडे बुद्रुक येथील अंजनी नदीच्या पुलावरून वाहून मयत झालेले राजेंद्र भगवान पाटील यांच्या पत्नी सरस्वतीबाई राजेंद्र पाटील यांना चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

कासोदा येथील किशोर भिकन पाटील यांनी म्हैस नाल्यात वाहून गेल्यामुळे त्याना ३७ हजार ५०० रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.शेतक-यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलू नये असे आवाहन केले.यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचेसह महसूल कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार