जळगाव : राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूचा ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जळगावात एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला. या सोबतच ९ लाख रुपये किमतीची २ वाहने व रोख २३ हजार रुपये असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मद्देमाल जप्त करीत भगवान साहेबराव पाटील (३०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गुरुदेव नगरात एका वाहनाच्या शोरुमच्या पाठीमागे असलेल्या गोदामात गुटखा साठवून ठेवण्यासह त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पथकाने गोदामात छापा टाकला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पानमसाला, गुटखा, तंबाखू, जर्दा, सुगंधित तंबाखू असा एकूण नऊ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा आढळून आला.

हा साठा जप्त करण्यासह दोन वाहने व रोख २३ हजार रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले. यात भगवान पाटील याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला. या प्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोहेकॉ रवींद्र पाडवी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






