शहादा :- पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याच्या मनस्तापातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कोंढावळ, ता. शहादा येथे घडली. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन अभिमन माळी (३५, रा. कोंढावळ, ता. शहादा) असे मयताचे नाव आहे. तर मीनाबाई जीवन माळी (३०, रा. कोंढावळ) व किरण भगवान माळी (३५, रा. कापडणे, ता. धुळे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.पोलिस सूत्रांनुसार, जीवन माळी यांची पत्नी मीनाबाई या किरण यांच्यासोबत २ नोव्हेंबर रोजी पळून गेली होती.
त्यामुळे जीवन यांनी मनस्ताप करून घेतला होता. त्यातूनच त्यांनी कोंढावळ येथील शेताच्या खळ्यात गळफास लावून घेतला. याबाबत मयताचे भाऊ सुभाष माळी यांनी फिर्याद दिल्याने मीनाबाई व किरण यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






