हंडिया (उत्तरप्रदेश):- सध्याच्या काळात फेसबूक (Facebook), इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सोशल मीडियाकडे तरुण-तरुणींचा वाढता कल लक्षात घेता गुन्हेगार याच माध्यमातून आपला हेतू साध्य करताना दिसून येत आहेत.आता अशीच एक घटना समोर आली आहे. फेसबूकवर मैत्री झाल्यावर चॅटिंग आणि त्यानंतर भेट झाल्यावर नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील हंडिया येथील आकाश पांडेय हा तरुण मुंबईतील एका खासगी बँकेत काम करतो. काही महिन्यापूर्वी आकाशची फेसबूकवर एका तरुणीसोबत मैत्री झाली. या मैत्रीनंतर दोघे एकमेकांसोबत चॅटिंग करु लागले. चॅटिंग करता करता एकमेकांना भेटण्याचं ठरलं. त्यानुसार, पीडित तरुणी दोन महिन्यांपूर्वी आपल्या बहिणीसोबत आझाद पार्क येथे फिरायला गेली होती. त्यानंतर ही तरुणी अचानक बेपत्ता झाली.

या प्रकरणी तिच्या बहिणीने कर्नलगंज पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होता. पोलिसांनी सांगितले की, आकाश पांडेय हा तरुणीला भेटण्यासाटी आझाद पार्क येथे पोहोचला होता. बाईक घेऊन तो पार्कच्या बाहेर वाट पाहत होता. ही तरुणी तेथे येताच तिला बाईकवर घेऊन तो रेल्वे स्टेशनला पोहोचला. त्यानंतर तेथून ट्रेन पकडून मुंबईला पोहोचला.

जवळपास दोन महिने ही तरुणी मुंबईतच होती आणि त्यानंतर पुन्हा आपल्या घरी आली तेव्हा तिच्यासोबत घडलेला प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत नोकरी देण्याचं आमिष दाखवून आकाश याने पीडित तरुणीला मुंबईला नेले. त्या ठिकाणी जवळपास दोन महिने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एक दिवस संधी पाहून पीडित तरुणीने घटनास्थळावरुन पळ काढला आणि आपल्या घरी दाखल झाली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. मग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






