आग्रा :- उत्तर प्रदेशमधल्या आगरामध्ये प्रजापति ब्रह्माकुमारी आश्रमातील दोन सख्ख्या बहिणींनी आपलं जीवन संपवलं आहे. गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. ही घटना आगरामधल्या जगनेर इथली आहे. आत्महत्येपूर्वी दोघींनीही तीन पानांची एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी संस्थेतील चार लोकांना दोषी ठरवलं असून त्यांना आसारामसारखी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनवणी खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
”योगीजींनी आरोपींना आसारामसारखी जन्मठेपेची शिक्षा द्यावी”, असं चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. ‘आज तक’ने हे वृत्त दिले आहे. मृत बहिणींनी सुसाईड नोटमध्ये चार आरोपींवर पैसे हडपण्यासह अनैतिक कृत्य केल्याचा ठपका ठेवला आहे. खैरागडचे एसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपी आगऱ्याच्या बाहेरचे आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आलेली असून इतर दोघांच्या अटकेसाठी एक टीम त्यांच्या मागावर धाडण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या दोघी बहिणींनी आठ वर्षांपूर्वी ब्रह्माकुमारीची दिक्षा घेतली होती.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने जनगेर येथे ब्रह्माकुमारी केंद्र बनवलं होतं. या केंद्रामध्ये या दोघी बहिणी राहात होत्या. दोघी बहिणींचं वय ३८ आणि ३२ आहे. मागच्या वर्षभरापासून केंद्रामध्ये सहन कारावा लागणारा त्रास त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मृत्यूला चौघे जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्यात नीरज सिंघल, धौलपूरचा ताराचंद, नीरजचे वडील आणि ग्वालियरच्या आश्रमात राहणारी एक महिला; यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. आमच्यासोबत गद्दारी झाली आहे, असं चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






