राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या अमळनेर येथील शिक्षकांच्या कारचा बाडमेर जिल्ह्यातअपघात सहा जणांच्या मृत्यू, तीन बालकाच्या समावेश

Spread the love

अमळनेर :- दिवाळीच्या सुटीत राजस्थानला फिरायला गेलेल्या शिक्षकांची कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाल्याने अमळनेर येथील दोन कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, एका वाहनात असलेल्या दिनेश सूर्यवंशी यांनी रस्त्यात कार थांबवून फोन करून योगेश साळुंखे यांना गाडी चालवण्यासाठी बोलावले, त्यामुळे अपघात झाला तेव्हा योगेश हे त्या वाहनात नसल्याने बचावले. मात्र, त्यांचे कुटूंब त्याच वाहनात असल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. बाडमेर जिल्ह्यातील धोरीमन्ना गावापासून सात किमी अंतरावर जैसलमेरकडे जाताना राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक धनराज सोनवणे यांच्यासह अन्य शिक्षक मित्र कुटुंबीय दिवाळीचे लक्ष्मीपूजन आटोपून रविवारी रात्री राजस्थान येथे फिरायला निघाले होते. दोन वाहनांमध्ये हे कुटुंब निघाले होते. त्यापैकी एका वाहनात धनराज सोनवणे आणि योगेश साळुंखे यांच्या कुटुंबासह सहा जण बसले होते. बाड़मेर-जैसलमेर राष्ट्रीय महामार्गावर जैसलमेरकडे जात असताना सोमवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास सुरतेची बेरीजवळ ट्रक आणि
कार समोरासमोर एकमेकांना धडकले. ट्रक ओव्हरटेक करत असताना कारवर धडकला, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. यात सहा जणांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत हा अपघात झाल्याने अमळनेरकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

कारचा अक्षरश: चक्काचूर झाल्याने अडकले मृतदेह

कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्यामुळे मृतदेह त्यात फसले होते. मागून येणाऱ्या मित्रांची कार घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले, यातील जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प पडली. पोलिसांच्या मदतीने अर्ध्या तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

काही वेळापूर्वी दुसरे वाहन चालवण्यासाठी उतरले अन….

धनराज सोनवणे चालवत असलेल्या कारमध्ये योगेश साळुंखे यांच्यासह त्यांचे कुटुंबदेखील बसलेले होते. परंतु त्यांच्या मागे दुसऱ्या वाहनात असलेल्या दिनेश सूर्यवंशी यांनी फोन करून योगेश यांना रस्त्यांत थांबवून आपल्या वाहनात गाडी चालवण्यासाठी बोलावून घेतले. त्यामुळे ते अपघातग्रस्त वाहनामध्ये नव्हते. परंतु या वाहनात त्यांची पत्नी गायत्री, मुलगा प्रशांत आणि मुलगी भाग्यश्री हे बसले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हे पण वाचा

टीम झुंजार