जळगाव : रात्री शेतामध्ये रखवालदारीसाठी गेलेल्या पांडुरंग पंडित पाटील (५२, रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांचा अज्ञात चोरट्यांनी डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून केला. खुनानंतर शेतातील ट्रॅक्टर व रोटोव्हेटर घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी वावडदे ते म्हसावद दरम्यान असलेल्या शेतात मालक गेले त्यावेळी उघडकीस आली.
भाऊबीजच्या पहाटे खुनाच्या घटनेने वावडदा परिसर हादरला आहे. जळगाव तालुक्यातील वावडदे ते म्हसावद दरम्यान ईश्वर मंसाराम पाटील (रा. बिलवाडी) यांचे शेत आहे. तेथे पांडुरंग पंडित पाटील (५२, रा. बिलवाडी, ता. जळगाव) हे रखवालदार म्हणून काम करतात. १४ रोजी रात्री ते शेतात रखवालीसाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी वस्तू टाकून खून केला. तसेच शेतातील ट्रॅक्टर व रोटोव्हेटर पळवून नेले.

सकाळी शेतमालकांचा मुलगा शेतात गेला त्यावेळी ही घटना समोर आली. त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे स्वप्निल पाटील, बिलवाडी येथील पोलिस पाटील सुवर्णा उंबरे घटनास्थळी दाखल झाले. पळून नेलेले ट्रॅक्टर सकाळी खडके फाटा, ता.एरंडोल येथे आढळून आले.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






