धक्कादायक! मंदिरात जाणाऱ्या दुःखी व्यथित महिलांची बनायची हितचिंतक, जादूचं पाणी देवून केली 5 जणींची केली हत्या, वाचा ‘सायनाइड मल्लिका’ची कहाणी.

Spread the love

नवी दिल्ली :- जगात असे अनेक गुन्हेगार झाले आहेत, ज्यांनी गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या तयार केल्या. अशा गुन्हेगारांपेक्षा धोकादायक दुसरा गुन्हेगार क्वचितच असेल. हे गुन्हेगार इतके कुख्यात बनले, की त्यांची चर्चा भारतासह परदेशातही झाली. भारतात काही वर्षांपूर्वी अशीच एक महिला गुन्हेगार होती. ती भारतातली पहिली महिला सीरियल किलर मानली जाते. तिची हत्या करण्याची पद्धत इतकी वेगळी होती, की लोक तिला ‘सायनाइड मल्लिका’या नावाने ओळखतात.

आजही तिच्याविषयी चर्चा ऐकली, तरी लोकांची भीतीने गाळण उडते.एखाद्या व्यक्तीला मारणं ही त्यांच्यासाठी अत्यंत किरकोळ गोष्ट होती. केडी केम्पन्ना या महिले विषयी माहिती घेऊ या. ही महिला अनेकदा तिचं नाव मल्लिका असं सांगत असे. त्यामुळे ती सायनाइड मल्लिका या नावानं ओळखली जात असे. बंगळुरूपासून दूर असलेल्या काग्गलीपुरामध्ये राहणाऱ्या केम्पण्णाचं लग्न एका टेलरशी झालं होतं. गरिबीमुळे ती स्वतःचा छोटा चिटफंड व्यवसाय चालवत असे. या व्यवसायात तिचं मोठं नुकसान झालं आणि सर्व पैसे बुडाले.

तिचा नवराही तिला सोडून गेला आणि तिला घर सोडावं लागलं. उदरनिर्वाहासाठी तिनं घरोघरी काम करायला सुरुवात केली आणि मग ती छोट्या-छोट्या चोऱ्या करू लागली. या सर्व घटना 1998 आणि त्यापूर्वीच्या आहेत. 1999मध्ये केली पहिली हत्याकेम्पन्नाला झटपट श्रीमंत बनायचं होतं. त्यानंतर तिनं 1999मध्ये गुन्हेगारीतून श्रीमंत होण्याचा विचार केला. त्या वर्षी तिने पहिल्यांदा ममता राजन (वय 30) नावाच्या महिलेची हत्या केली. तिची हत्या करण्याची पद्धत आश्चर्यकारक होती. लूटमार करणं हा तिचा प्रमुख उद्देश होता. ती एक भक्त म्हणून मंदिरांमध्ये जात असे. नंतर तिथल्या अतिशय दुःखी दिसणाऱ्या महिलांना केम्पन्ना टार्गेट करत असे.

व्यथित महिलांची बनायची हितचिंतक. अशा महिलांना टार्गेट केल्यानंतर ती त्यांच्याशी बोलू लागली. त्यांच्या व्यथा ऐकून त्यांची हितचिंतक असल्याचं भासवत असे. तसंच दुःख टाळण्यासाठी विशेष पूजा करण्याचा सल्लादेखील देत असे. गावापासून दूर असलेल्या एका मंदिरात तिनं स्वतः या पूजेची व्यवस्था केलेली होती. ती महिलांना त्यांचे सर्व दागिने घालून पूजेला उपस्थित राहण्यास सांगत असे. पूजा आटोपल्यानंतर ती त्यांना प्रसाद म्हणून पूजेचं पाणी प्यायला द्यायची. या पाण्यात सायनाइड मिसळलेलं असायचं. सायनाइड हे विष असून ते प्यायल्यानंतर महिलांचा मृत्यू होत असे. त्यानंतर केम्पन्ना त्यांचे दागिने चोरून पळून जायची.

पाच महिलांची केली हत्या. 2000 मध्ये केम्पन्नाला पहिल्यांदा अटक झाली. तेव्हा ती घरातून सामान चोरत असताना पकडली गेली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी तिची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यावर ती पुन्हा हत्या करण्यासाठी बाहेर पडली. 2007पर्यंत तिने पाच महिलांची हत्या केली होती. 2008मध्ये पोलिसांनी तिला अटक केली. पोलीस बराच काळ तिचा शोध घेत होते. ती चोरीचं सोनं विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांना टिप मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात यश आलं. केम्पन्नाला दोन खुनांच्या खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु, तिच्याविरुद्ध केवळ परिस्थितीजन्य पुरावे असल्यामुळे शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.

हे पण वाचा

टीम झुंजार