खळबळजनक! रक्षक बनला भक्षक; शारीरीक सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Spread the love

धुळे :- जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि ज्यांचे शोषण झाले त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे, तोच रक्षक भक्षक झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हा सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. मागील काही दिवसांपासून त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमंत पाटील यांच्यावर आयपीसी 354 अ, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 तसेच आयटी अॅक्ट कलम 67, 67 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

शारीरीक सुखाची मागणी, अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा. सन 2022 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान निरीक्षक हेमंत पाटील यांनी पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच अश्लील वक्तव्य करीत महिलेला कपडे काढण्यास भाग पाडून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली व व्हिडिओदेखील व्हायरल केला. याबाबत वाच्यता केल्यास तुझे मरण जवळ आले आहे, अशी धमकी निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या साथीदारांनी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले की,कुणीही महिला व मुलीवर भीती दाखवून अन्याय-अत्याचार केल्यास असल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, दोषींची हयगय केली जाणार नाही, असेही बारकुंड म्हणाले.

हे पण वाचा

टीम झुंजार