कोरेगाव पार्क :- मारहाण आणि खंडणीच्या गुन्ह्यात साक्ष नोंदविण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणावे, असा आदेश न्यायालयाने दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एम. पाटील यांनी हा आदेश दिला.एस. डी. कांबळे असे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकाचे नाव असून ते कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत होते. हनिफ सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून २० मे २०१३ ला कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात शिवाजी शिंदे, साईनाथ सातव, सोमनाथ सातव, विष्णू सातव, ज्ञानेश्वर सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मारहाण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली, तक्रारदाराच्या कार्यालयात घुसून दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास करून २४ सप्टेंबर २०१३ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपींच्यावतीने ॲड. मिलिंद पवार आणि ॲड. आकाश देशमुख काम पाहात आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. मात्र, खटल्याचे तपासी अंमलदार असलेले कांबळे यांची साक्ष अद्याप नोंदविण्यात आलेली नाही.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.आधाही काढले होते अटक वॉरंट न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. कांबळे यांना वारंवार फोन केले. मात्र, ते फोन उचलत नाहीत. तसेच, पहिल्यांदा काढलेल्या अटक वॉरंटची नोटीस त्यांना व्हाटसॲपवर पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही, असे त्यात नमूद आहे. या अहवालानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज करून कांबळे यांना पकडून आणण्यासाठी अटक वॉरंट काढण्यासाठी विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने पुन्हा अटक वॉरंट काढले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






