कौशांबी – उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेने तिच्या घरात काम करणाऱ्या नोकरावर बळजबरीनं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. नोकराने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यावर स्वरक्षणासाठी महिलेने चाकूने नोकराचा प्रायव्हेट पार्ट कापला. ज्यामुळे नोकर गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या नोकराची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना चादर आणि उशी रक्ताने माखलेली दिसली. पोलिसांनी चाकू जप्त केला. मात्र पोलिसांनी पीडित महिलेच्या जबाबानंतर तिच्याविरोधातच गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे. ही घटना मंझनपूरच्या शरीफपूर गावातील आहे. इथं राहणाऱ्या एका महिलेचा पती सौदी अरबमध्ये कामाला आहे. तिच्या घरी नोकर कामाला आहे. मागील काही दिवसांपासून नोकराची नियत बदलली होती असा आरोप आहे.

जेव्हा महिलेच्या घरी कोणी नव्हते तेव्हा नोकराने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेनं स्वत:च्या बचावासाठी किचन बंद करण्याचा बहाणा करून तिथून चाकू घेऊन आली. त्यानंतर नोकर जसा तिच्या जवळ आला तसा तिने चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. चाकूच्या हल्ल्याने नोकर गंभीर जखमी झाला आणि तिथून पळ काढला. त्यानंतर महिला थेट पोलीस ठाण्यात पोहचली तिथे तिने घडलेला प्रसंग सांगितला. जे ऐकून पोलिसांना धक्का बसला, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. परंतु पोलिसांनी जखमी नोकराच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधातही गुन्हा नोंद केला.
त्यासोबत तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.२३ वर्षीय जखमी नोकरानं दावा केला की, मी महिलेच्या घरी लहानपणापासून काम करतोय. घटनेच्या दिवशी महिलेने मला तिच्याजवळ बोलावले. त्यानंतर माझ्या तोंडावर रुमाल बांधून मला बेशुद्ध केले. त्यानंतर प्रायव्हेट पार्ट कापला. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला वेदना झाल्या. त्यानंतर कसंतरी मी तिथून पळ काढून घरी आलो आणि तिथून मला हॉस्पिटलला आणण्यात आले. तर महिलेने म्हटलं की, मी घरात एकटीच होते. तेव्हा नोकर हसत हसत घरात शिरला. त्याने माझा हात पकडला आणि खोलीत घेऊन जात होता. जेव्हा मी त्याला हात सोडायला सांगितला तेव्हा त्याने बळजबरी केली. मग मी बहाणा बनवत किचनमध्ये गेली, तिथून चाकू घेऊन आली. त्याने ऐकलं नाही शेवटी मी बचावासाठी त्याच्यावर चाकू हल्ला केला.

दरम्यान या प्रकरणी डीसीपी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. शरीफपूर इथं एका मुलाचे त्याच्या शेजारील महिलेसोबत वाद झाला होता. ज्यात महिलेने मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला. जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला जिल्हा रुग्णालयात पाठवले. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. महिलेला ताब्यात घेत हल्ल्यातील चाकूही जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं त्यांनी म्हटलं.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






