चीन : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. तब्बल एक वर्षानंतर चीनमध्ये २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होऊ लागल्याने आता इतर देशांच्या चिंता ही वाढू लागल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती पुन्हा बिघडल्याने इतर देशही सतर्क झाले आहेत.
चीनमध्ये दररोज 3 हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शांघायमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक भागात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे बिजिंगमध्ये येणाऱ्या लोकांना कोरोना चाचणी (Corona Test) बंधनकारक करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणं आणि गंर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. WHO ने वाढत्या संसर्गामुळे जगभरातील देशांना Deltacron वेरिएंटबाबत सतर्क केले आहे. या नव्या व्हायरसमुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. फ्रांस, यूके, नेदरलँड आणि डेन्मार्क सह युरोपीतील अनेक देशांना डेल्टाक्रॉनबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या देशात डेल्टाक्रॉनचे प्रकरणं आढळले आहेत.