धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबल ड्युटी संपली, रायफल घरी घेऊन गेला अन् त्याने स्वत:वर बंदुकची गोळी झाडून संपवले जीवन.

Spread the love

सोलापूर :- येथे भाऊबीजेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यातील रायफल घरी घेऊन जात टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने स्वत:वर बंदुकची गोळी झाडून जीवन संपवले आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.राहुल शिरसाट असे जीवन संपवलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शिरसाट हे केशव नगर पोलीस वसाहतीत राहत होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल शिरसाट हे सोलापूर पोलिस दलात कार्यरत होते.

त्यांच्याकडे एसएलआर रायफल होती. दरम्यान, मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर शिरसाठ यांनी रायफल पोलिस शस्त्रआगारात जमा केली नाही. ही बंदूक काम संपल्यावर जमा करणे बंदनकारक आहेत. दरम्यान, राहुल शिरसाट यांनी रायफल जमा न करता त्यांनी ती घरी नेली. बुधवारी सकाळी घरी असतांना त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने कोणतेही पत्र लिहिलेले सापडलेले नाही. यामुळे त्याने आत्महत्या का केली या बाबत माहिती मिळू शकली नाही. हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी शिरसाठ यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णलायत पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार