एक दिवस पतीने पीडितेला चोरीचा जाब विचारला व या संशयाची शहानिशा करण्यासाठी भोंदूबुवाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले.
पन्हाळा : चोरीच्या संशयावरून भोंदूबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडला.यानंतर संबंधित महिलेने फिर्यादी दिली.
त्यानुसार पन्हाळा पोलिसांनी अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबुवा रामू कोलकर ऊर्फ रामा मिस्त्री याच्यासह पती आणि सासूवर गुन्हा नोंद केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी घरातील सोन्याची चेन चोरीस गेली होती. त्याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा पती भोंदूबुवाकडे गेला. तेव्हा त्याने ती चेन तुझ्या पत्नीने चोरून तिच्या आईला दिली आहे, असे सांगितले. दुसरीकडे भोंदूबुवा पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी करीत होता. त्याला तिने दाद दिली नाही.
एक दिवस पतीने पीडितेला चोरीचा जाब विचारला व या संशयाची शहानिशा करण्यासाठी भोंदूबुवाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने आईला सोबत घेऊन भोंदुबुवासमोर पत्नीची विवस्त्र पूजा केली. याबाबत महिलेने पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५