यावल : तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या लोकशाही दिना कडे विविध विभागाच्या अधिकारी वर्गाने पाठ फिरवली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन हा आयोजित असतो यात नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचा निपटारा केला जातो. दरम्यान लोकशाही दिनी विविध विभागातील काही अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी हे गैरहजर होते तेव्हा गैरहजरांना आता तहसीलदारांकडून नोटीसा काढल्या जाणार आहेत
यावल येथील तहसील कार्यालयामध्ये विविध विभागाच्या तक्रारींचा न्याय निपटारा करण्याकरिता दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन घेतला जातो. या लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांना विविध विभागातील तक्रारी करता येतात आणि केलेल्या तक्रारी बद्दल काय कारवाई करण्यात आली किंवा त्यांचा काय निपटारा कसा झाला या संदर्भात देखील माहिती दिली जाते. दरम्यान या लोकशाही दिनी काही विभागातील अधिकारी तसेच त्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित राहिले नव्हते. तेव्हा अनुपस्थित राहिलेल्या विविध विभागाचे प्रमुख यांना त्यांच्या अनुपस्थिती संदर्भात तहसीलदारांकडून नोटीस बजावली जाणार आहे
या लोकशाही दिनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, सहाय्यक निबंधक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस ठाणे, नगरपालिका, आरोग्य विभाग सह इतर विभागातील प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र काही विभागातील प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते अशांना आता नोटीस बजावली जाईल असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन