उत्तर 24 परगणा :- पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली.
एकाच कुटुंबातील ४ लोकांचे मृतदेह घरात आढळले.
बृंदावन कर्माकर (वय ५२), पत्नी देवाश्री कर्माकर आणि मुलगी देबलीना ( वय १७) आणि मुलगा उत्साह ( वय ८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बृंदावन कर्माकर हे कपड्याचे व्यापारी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी खर्डा विभागात एम.एस मुखर्जी रोड येथे एका बंद घरात हे मृतदेह आढळून आले. बृंदाबन कर्माकर यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना आधी विष दिले. नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बृंदावन यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते.
घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली. त्यामध्ये पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे नमूद केले होते. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या कर्माकर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याने काही लोकांनी पोलिसांना कळवले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. कर्माकर यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि मुलांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते, असेही पोलिसांनी सांगितले.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






