चेंबूर :- शीतपेयातून गुंगीचे औषध देत शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.
पीडित तरुणी काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात वडील राहत असलेल्या घरी आली होती. शुक्रवारी तरुणी घरात एकटीच असताना शेजारी राहणारा तरुण तिच्या घरी काही कामानिमित्त आला होता. तरुणीच्या ओळखीचा असल्याने तिने त्याला घरात घेतले. त्यानंतर त्याचा आणखी एक मित्र तरुणीच्या घरी आला.
यावेळी आरोपींनी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिला समजताच तिने तत्काळ चेंबूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






