Viral Video: कायमच आपण ऐकत आलो आहोत प्रेम हे नेहमी आंधळं असतं. प्रेमात व्यक्ती सर्व आव्हाने पार करू शकतो. मात्र जर आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर दूसरी मुलगी अथवा मुलगा दिसला की प्रत्येकाच्या मनात थोडा राग निर्माण होतोच.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली एका बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसत आहेत. या तरुणींचा हा वाद इतका टोकाला जातो की दोघींमध्येही भररस्त्यात मारामारी सुरू होते. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी ट्रेनमध्ये तर कधी विमानात महिलांमध्ये हाणामारी होत असते. तर कधी कॉलजेच्या मुलींमध्ये तूफान राडा झाल्याचेही अनेक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे व्हायरल व्हिडिओमधील आपल्याला एका काळ्या ड्रेसमध्ये एक तरूणी आणि काळ्या जीन्स टीशर्टमध्ये दुसरी तरूणी दिसत आहे.
जीन्स टीशर्टमध्ये असलेली तरूणी एका चहाच्या टपरीवर बसलेली असते. तेवढ्यात ड्रेसमधील तरूणी तिथं येते आणि दुसऱ्या तरूणीला मारहाण करण्यास सुरूवात करते. पण काळ्या ड्रेसमधील तरूणी इतक्या रागात आहे की, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये एवढंच नाही तर ती चक्क दुसऱ्या तरूणीला तेथिल खुर्च्या फेकून मारतेय. जीन्समधील तरूणी तिथूंन पळ काढण्याचाही प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. टपरीवर सुरू असलेला हा राडा पाहून लोकही चक्रावून गेलेत.
व्हायरल व्हिडिओ हा @gharkekalesh या एक्स (ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ हा यूपीतील गोरखपूर येथील चहाच्या टपरीच्याजवळील आहे. हा व्हिडिओ चहाच्या टपरीवरील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय.व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोन्ही तरुणींना खडेबोल सुणावले आहेत. तर काही जणांनी बापरे! एका पोराला दोन गर्लफ्रेंड आहेत असे म्हणत खिल्ली उडवली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






