एरंडोल :- हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गायींची वाहतूक करणारे वाहन बजरंगदल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी पकडून
पोलिसांच्या ताब्यात दिले.वाहनातील दहा गायी आणि दहा वासरांना धरणगाव येथील गोशाळेत जमा करण्यात आले.पोलिसांनी वाहन चालकासह तीन जणांना अटक
केली आहे.पोलिसांनी वाहनासह गायी व वासरू ताब्यात घेतले.याबाबत माहिती अशी की आयशर कंपनीचे वाहन क्रमांक एम.एच.१८ बीजी ७०४० मध्ये गायींची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती बजरंगदल व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याना माहिती मिळाली.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर सदर क्रमांकाच्या वाहनावर पाळत ठेवून शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अमळनेर नाका,हॉटेल जत्रासमोर आयशर थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र चालकाने वाहन वेगाने नेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते वाहनासमोर उभे राहिल्यामुळे चालकाने वाहन थांबवले.बजरंगदल व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी वाहनाच्या मागील बाजूस लावलेल्या लाकडी पाट्या काढल्या असता त्यामध्ये गिर जातीच्या दहा दुभत्या गायी व दहा वासरे दोराच्या सहाय्याने कोंबून बांधल्याचे दिसून आल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले.
वाहनचालकाकडे गायींच्या वाहतुकीबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती कळवली.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,हवालदार अनिल पाटील,संदीप पाटील यांचेसह पोलीस कर्मचा-यांनी संतप्त कार्यकर्त्याना शांत करून गुरांसह वाहन पोलीस स्थानकात आणले. अँड. अजिंक्य काळे यांनी धरणगाव येथील श्रीपाद पांडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ते आकर्ष तिवारी,संजय महाजन यांचेसह पोलीसस्थानक येथे आले.
यावेळी अँड.काळे यांचेसह अँड.नीरज जगताप,अँड. चंद्रकांत पारखे यांचेसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचासमक्ष पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दहा गायी आणि दहा वासरे बांधलेल्या स्थितीत आढळून आले. वासरांमध्ये एका वासराचा पाय तुटला असून सदर वाहनातून गायी व वासरू कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.याबाबत चालकाकडे विचारणा केली असता सदरची गुरे धुळे येथून कुरेशी नामक व्यापा-याने खरेदी केली असून ते हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले.
याबाबत श्रीपाद पांडे यांनी दिलेल्या ताकारीवरून आयशरचालक रवींद्र राजेंद्र माळी यांचेसह आबा बजरंग पाटील आणि इमरान कुरेशी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील तपास करीत आहेत.पोलिसांनी बारा लाख रुपये किमतीचे वाहन,सात लाख रुपये किमतीच्या दहा दुभत्या गायी आणि एक लाख रुपये किमतीचे वासरे ताब्यात घेतले असून गायी व वासरांना धरणगाव येथील गोशाळेत जमा करण्यात आले आहे.
दरम्यान धुळे येथून तीन वाहनांमधून गुरे
भरण्यात आले होते मात्र एरंडोल येथे एक वाहन पकडल्याचे समजताच अन्य दोन वाहने दुस-या मार्गाने निघून गेले असल्याचे उपस्थित पदाधिका-यांनी
सांगितले.गायींची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले होते.सहाय्यक पोलीस गणेश अहिरे हवालदार अनिल पाटील व त्यांच्या सहका-यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व
कार्यकर्त्यांना शांत केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा